Leopards in Washim : मानोऱ्यातील सोमेश्वरनगर रस्त्यालगत 2 बिबट्यांचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण - मनुष्य वस्त्यांजवळ बिबट्या
मानवी वस्त्यांजवळ वन्य प्राणी येण्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. वाशीम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातील गहुली ते सोमेश्वर नगर रस्त्यालगत बिबट्या फिरताना आढळून आल्याने (Leopards Spotted In Manora) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.