डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने नागपूरची आरोग्य यंत्रणा बेजार; आत्तापर्यंत १९४ रुग्णाची नोंद - nagpur dengue patients news
नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच आता जीवघेण्या डेंगूने डोके वर काढले आहे. ज्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडले आहे. दरम्यान, मे महिन्यात डेंग्यूचे ६ रुग्ण पुढे आले होते. तर जून महिन्यात डेंग्यू रुग्णांचा आकडा ८६ झाला होता. त्यातच आता गेल्या १४ दिवसांमध्ये ९६ रुग्णांची नोंद झाल्याने शहरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. जानेवारी २०२१ ते आत्तापर्यंत शहरात १९४ रुग्णाची नोंद झाली आहे, तर 4 संशयित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.