महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

...तर आयुष्यभर एसटीच्या स्टेअरिंगला हात लावणार नाही; आझाद मैदानावरील संपकऱ्यांच्या प्रतिक्रिया - एसटी आंदोलक कर्मचारी संतप्त प्रतिक्रिया

By

Published : Feb 22, 2022, 8:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

मुंबई - एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी (MSRTC Merger) उच्च स्तरीय समितीचा सीलबंद अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आला आहे. मात्र, आज विलीनीकरणाच्या याचिकेवरील सुनावणीला (MSRTC Merger Petition Hearing) न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र, आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शेकडो एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आले होते. न्यायालयाच्या सुनावणीनंतर आझाद मैदानांवरील संपकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यत आम्ही संप सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, विलीनीकरण झाले नाही तर दुसरी नोकरी करू पण आयुष्यभर एसटीच्या स्टेअरिंगला हात लावणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया एसटी संपकऱ्यांनी दिल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details