ST Worker Strike : अनिल परबांच्या 'त्या' वक्तव्यावरुन एसटी कर्मचारी संतापले; म्हणाले, परिवहन मंत्री खोटारडे... - st worker strike latest news
मुंबई - संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आव्हानाला बळी पडले आहे. त्यांच्या मनात गैरसमज पसरवले जात आहे. 31 मार्च 2022 पर्यंत एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दोन्ही सभागृहात केले आहे. तसेच, अनिल परब यांनी सांगितले की, राज्यभरात 48 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यापैकी फक्त चार कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी आत्महत्या केली आहे. परिवहन मंत्र्यांच्या या माहितीवरून राज्यभरातील संपकरी एसटी कर्मचारी चांगला संतापलेला आहे. परिवहन मंत्री खोटारडे आणि लबाड असल्याची प्रतिक्रिया संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST