Video : एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढले; आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ठिय्या - ST workers agitation
मुंबई - आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करत होते. मात्र शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी ज्याप्रकारे गदारोळ झाला, त्यानंतरच या लोकांना आझाद मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे शनिवारी पहाटे शेकडो एसटी कर्मचारी छत्रपती महाराज टर्मिनसवर येऊन बसले. रेल्वे पोलिसांनी त्यांना जाण्यास सांगितले, तेव्हा हे लोक त्याच पोलिसांना हात जोडून आझाद मैदानात बसू द्या, अशी विनंती करत होते, असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला. रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी या लोकांना आझाद मैदानातून जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोप आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST