SSC Exam Copy Case Jalna : जालन्यातील मंठ्यात कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट.. परीक्षेत सर्रासपणे कॉपीचा प्रकार सुरु
जालना : जालन्यातील मंठ्यामध्ये असलेल्या स्वामी विवेकानंद विद्यालय परिक्षा सेंटरवरील 10 वीच्या परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कालचा हा व्हिडिओ असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मराठी विषयाच्या पेपरला परीक्षार्थींना कॉप्या पुरवण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचं वास्तव या व्हिडीओमधून समोर आलं आहे. या व्हिडीओमुळे परीक्षेत कॉप्या सर्रासपणे चालत असल्याचं वास्तव देखील समोर आलं आहे. भरारी पथके कुठं आहेत? परीक्षा सेंटरवर कॉप्या पुरवणाऱ्या तसेच कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच कॉपी बहाद्दर परीक्षा सेंटरवर कारवाई होणार का? असा प्रश्न उभा निमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच कॉपी रोखणारे भरारी पथकं कुठे उडाली आहे की ते देखील शिक्षण संस्था चालकांना मॅनेज झाले आहेत? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST