Tokyo Olympics : पैलवान रवी दहिया फायनलमध्ये; कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा - भारतीय पैलवान रवी दहिया
टोकियो - भारतीय पैलवान रवी दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. कझाकिस्तानच्या सनायेव नूरिस्लामला धोबीपछाड देत रवीने सेमीफायनल सामन्यात 57 किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह त्यानं आपलं रौप्य पदकही निश्चित केलं आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झाले आहे. आता फायनलमध्ये रवीकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. या यशानंतर रवी कुमारच्या कुटुंबीयांचा आनंद ओसंडून वाहत होता. रवी कुमार हा सोनीपतमधील नाहरी गावचा रहिवासी असून, त्याचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. रवीच्या कुटुंबीयांसोबत 'ई टीव्ही भारत'ने संवाद साधला.