ग्लोब सॉकर पुरस्कार : रोनाल्डो ठरला शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी रविवारची संध्याकाळ खास ठरली. यंदाच्या दुबई ग्लोब सॉकर पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोला शतकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. बार्सिलोनाच्या लिओनल मेस्सी आणि लिव्हरपूलच्या मोहम्मद सालाह यांना नमवून रोनाल्डोने हा पुरस्कार जिंकला. "ही माझ्यासाठी एक मोठी कामगिरी आहे'', असे रोनाल्डो हा पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला. ३४ वर्षीय रोनाल्डो या हंगामात पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. त्याने २०२०मध्ये क्लब आणि देशासाठी मिळून एकूण ४४ गोल केले आहेत.