भारत वि. इंग्लंड : दुसरी कसोटी पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला - भारत वि. इंग्लंड दुसरा कसोटी सामना
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना चेन्नईत रंगणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येईल. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतातील सामन्यादरम्यान प्रेक्षक मैदानात परतणार आहेत. विशेष म्हणजे, दररोज १५,००० लोकांना तिकिटे मिळणार आहेत. सामन्यादरम्यान चाहत्यांना कोरोनासंबंधित नियमांचे अनुसरण करणे बंधनकारक आहे.