VIDEO : क्विंटन डी कॉकविषयी आफ्रिकेचा प्रशिक्षक म्हणतो... - Coach Mark Boucher
पाकिस्तान संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९५ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्याच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळविले. पाकिस्तानने दिलेल्या ३७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २७४ धावांपर्यंत मजल मारू शकला. २००३ नंतर प्रथमच आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागली. या पराभवानंतर आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तान दौरा संपल्यानंतर डी कॉक कर्णधार राहणार नसल्याचे संघाचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरने सांगितले.