VIDEO : कराची कसोटीत विजय मिळवल्यानंतर बाबर आझम म्हणतो... - बाबर आझम लेटेस्ट न्यूज
डावखुरा फिरकीपटू नौमान अलीने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर पाकिस्तानने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटीत सात गड्यांनी नमवले. नौमानव्यतिरिक्त यासिर शाहने चार फलंदाजांना तंबूत धाडले. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ २४५ धावांवर आटोपला. त्यामुळे विजयासाठी मिळालेले ८८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने सहज गाठले. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर बाबर आझमने आपला आनंद व्यक्त केला आहे. 'हा एक महत्त्वपूर्ण विजय आहे. निराशाजनक न्यूझीलंड दौऱ्यामुळे हा विजय आवश्यक होता'', असे बाबरने सांगितले.