मीराबाई चानू: लाकडाचा भारा उचलण्यापासून ते ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास - मीराबाई चानू
टोकियो - भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 49 किलोग्राम वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकणारी मीराबाई पहिली खेळाडू ठरली. याआधी असा पराक्रम कोणत्याही भारतीय वेटलिफ्टरला करता आलेला नाही. मीराबाई एका गरीब कुटुंबातून आली आहे. ती जंगलात सरपणासाठी लाकडे गोळा करण्यासाठी जात असे, यावेळी ती लाकडाचा मोठा भारा घेऊन घरी येई, तेव्हा तिला आजूबाजूच्या लोकांनी तू खूप ताकतवान आहेस, असे सांगितलं. मीराबाईने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत ते सिद्ध देखील केलं आहे. यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला मीराबाईचा हा खास आढावा...