Tata Steel Tour Championship 2021 : टाटा स्टील टूर चॅम्पियनशिप 2021 मध्ये पुण्याच्या उदय मानेने पटकावलं विजेतेपद - उदय माने
जमशेदपूर शहरात सुरू असलेल्या टाटा स्टील टूर चॅम्पियनशिप 2021 चा ( Tata Steel Tour Championship 2021 ) रविवारी समारोप झाला. महाराष्ट्रातील पुण्याच्या उदय मानेने विजेतेपद पटकावले. तर राशिद खान उपविजेता ठरला. विजेत्या उदय मानेला 22.5 लाख रोख आणि उपविजेत्या रशीद खानला 15 लाख रोख आणि ट्रॉफी देण्यात आली. बेलडीह गोल्फ कोर्स आणि गोलमुरी गोल्फ कोर्स येथे तीन दिवस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देश-विदेशातील नामवंत गोल्फपटूंनी सहभाग घेतला. ज्यामध्ये भारताची प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावा, एसपी चौरसिया, शुभंकर शर्मा यांसारख्या खेळाडूंचाही सहभाग होता. समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून टाटा स्टीलचे एमडी टीव्ही नरेंद्रन आणि जमशेदपूर गोल्फ क्लबचे कॅप्टन संजीव पाल यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. टीव्ही नरेंद्रन, एमडी, टाटा स्टील, यांनी विजेत्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन केले.