कसोटीत 'खास' कारनामा केल्यानंतर रबाडाने व्यक्त केला आनंद - कगिसो रबाडा
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने कसोटीत २०० बळी घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. रबाडा म्हणाला, ''हा माझ्यासाठी विशेष क्षण आहे. जेव्हा आपण कारकिर्दीची सुरुवात करतो, तेव्हा आपण अशा विक्रमाचा विचार करत नाही. तुम्हाला फक्त तुमचे काम चांगल्या पद्धतीने करायचे आहे.'' रबाडाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हा खास विक्रम रचला. आफ्रिकेकडून २०० कसोटी बळी घेणारा रबाडा आठवा गोलंदाज ठरला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या हसन अलीला तंबूत पाठवत रबाडाने ही विक्रमी कामगिरी नोंदवली.