ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने मागितली माफी..पाहा व्हिडिओ - Paine on SCG Test
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार टिम पेनने सिडनी कसोटी दरम्यान भारतीय संघाशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. भारताच्या दुसऱ्या डावात यष्टीरक्षण करताना त्याने अनेक झेल सोडत निराशाजनक कामगिरी केली. भारतीय संघाने हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांच्या चिवट खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी अनिर्णीत राखली.