सचिन तेंडुलकर पुन्हा ताडोबाच्या प्रेमात - tadoba
नागपूर - भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चंद्रपूर जिह्यात असलेल्या ताडोबा-अंधारीच्या प्रेमात पडला आहे. तो नागपूर विमानतळाहून ताडोबासाठी स्वत: गाडी चालवत रवाना झाला. यावेळी त्याची पत्नी अंजली ही देखील सोबत होती. ताडोबाच्या चिमूर भागातील एका खासगी रिसॉर्टमध्ये सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांचे वास्तव्य असणार आहे. दरम्यान, सचिनने अनेकवेळा ताडोबा जंगल सफारी केली आहे. यापूर्वी सचिन कुटुंबीयांसह उमरेड कऱ्हाडला आणि ताडोबा येथे सफारीसाठी मुक्कामी होता.