Video : निरज चोप्राला मोदींनी खाऊ घातला चुरमा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक गाजवलेल्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भालाफेकीतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचे कौतूक केले. विजय तुझ्या डोक्यात जात नाही, तसेच पराभव मनात घर करून बसत नाही, असे माझे तुझ्या बाबतीत निरक्षण असल्याचे मोदी निरजला म्हणाले. तसेच यावेळी मोदींना निरजला चुरम्याचा आस्वाद घेण्यास सांगितले. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासंदर्भातील एक किस्सा त्यांनी खेळाडूंना ऐकवला.