नरेंद्र मोदींची टोकियो पॅरालिम्पिक खेळाडूंशी भेट, रौप्य पदक विजेते सुहास यथिराज म्हणाले... - पंतप्रधान नरेंद्र मोदी सुहास यथिराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंची रविवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सुहास यथिराज यांच्याशी त्यांनी बातचित केली. नोएडाचे जिल्हाधिकारी सुहास यांनी मोदींना आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगितल्या. यात त्यांनी, शाळेने त्यांना तब्बल तीन वेळा अॅडमिशनसाठी नकार दिल्याचे सांगितलं.