''भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा'' - जसप्रीत बुमराह लेटेस्ट न्यूज
भारत आणि इंग्लंड यांच्यात एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा हा भारतातील पहिला कसोटी सामना आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाबाद शतक झळकावले. त्यामुळे इंग्लंडला मजबूत स्थिती गाठता आली. फक्त रूट नव्हे तर प्रत्येक विकेट महत्त्वाची असल्याचे बुमराहने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितले. यासह भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा असल्याचेही बुमराह म्हणाला.