प्रेक्षकांनी भरलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणे हे माझे बालपणाचे स्वप्न होते - हार्टले - Alex Hartley exclusive interview
मुंबई - इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने २०१७ च्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ९ धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले होते. इंग्लंडच्या या विजयात अॅलेक्स हार्टले हिने मोलाची भूमिका निभावली होती. तिने या स्पर्धेतील ८ सामन्यात १० गडी बाद केले होते. अंतिम सामन्यात तिने भारताची हरमनप्रीतचे विकेट मोक्याच्या क्षणी घेतली. यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली. अखेरीस इंग्लंडने सामन्यासह विश्वकरंडक जिंकला. 'ईटीव्ही भारत'ने हार्टले हिच्याशी खास बातचित केली. यात तिने, प्रेक्षकांनी भरलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणे हे माझे बालपणाचे स्वप्न होते, असे सांगितलं. पाहा आणखी काय म्हणाली हार्टले...