सिराजची कृती अनेकांना प्रेरणा देईल - लायन
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायनने वर्णद्वेशी शेरेबाजीला 'अत्यंत वाईट' म्हटले आहे. ''कोणत्याही प्रकारचे वांशिक भाष्य किंवा कोणत्याही प्रकारच्या तिरस्कारयुक्त भाषेला इथे स्थान नाही. लोकांना वाटते की, हा विनोद आहे पण त्याचा इतर मार्गानेही परिणाम होऊ शकतो. मोहम्मद सिराजने या घटनेबाबत केलेली तक्रार इतरांना प्रेरणा देईल'', असे लायन म्हणाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटीदरम्यान भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहाला प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी वक्तव्याला सामोरे जावे लागले होते.