मेस्सीचा करार 'लीक' झाल्याप्रकरणी प्रशिक्षकांनी व्यक्त केली नाराजी
स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि फुटबॉल क्लब बार्सिलोना एफसी यांच्यातील करार स्पेनच्या एका दैनिकाने वृत्तपत्राने समोर आणला. या वृत्तानुसार, चार हंगामांसाठी बार्सिलोनाने मेस्सीसाठी ५५५ मिलियन युरो (६७३ मिलियन डॉलर्स) मोजले. कोणत्याही खेळामधील खेळाडूसोबतचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा करार आहे. हा करार बाहेर आल्याप्रकरणी बार्सिलोनाचे प्रशिक्षक रोनाल्ड कोमॅन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोमॅन म्हणाले, "याबद्दलची माहिती माध्यमांना कशी मिळाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्लबमधील एखाद्याने हे उघडकीला आणले असेल, तर त्याचे क्लबमध्ये भविष्य असू शकत नाही."