VIDEO : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे जुव्हेंटसचा सहज विजय
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे जुव्हेंटसने सेरी-ए स्पर्धेत पार्मावर ४-०ने मात दिली. पार्माचा माजी खेळाडू आणि जुव्हेंटसकडून खेळणाऱ्या देजान कुलुसेवस्कीने संघासाठी पहिला गोल नोंदवला. या विजयासह नऊ वेळा गतविजेत्या जुव्हेंटसने इंटर मिलानशी बरोबरी केली आहे. हे दोन्ही संघ अव्वल स्थानावरील एसी मिलानच्या एक गुण मागे आहेत.