महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

विचित्र पद्धतीने बाद झाल्यावर पुजारा म्हणतो... - Cheteshwar Pujara chennai dismissal

By

Published : Feb 8, 2021, 6:51 AM IST

भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीत भारत ३२१ धावांनी पिछाडीवर असून त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी अद्याप १२२ धावांची गरज आहे. संघाला चांगली धावसंख्या गाठून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या चेतेश्वर पुजाराला ७३ धावांवर 'अनलकी' पद्धतीने बाद व्हावे लागले. फिरकीपटू डॉम बेसच्या गोलंदाजीवर पुजाराने पूल शॉट मारला. तो चेंडू फॉरवर्डला उभ्या असलेल्या ओली पोपच्या पाठीला लागून हवेत उडाला. तेव्हा त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रोरी बर्न्सने तो पकडला आणि पुजाराला परत जावे लागले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर पुजाराने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. फलंदाज म्हणून मी यात काहीच करू शकत नाही, असे पुजाराने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details