आयपीएलमुळे आगामी कसोटी मालिकेच्या तयारीवर परिणाम नाही : पुजारा - Cheteshwar Pujara latest news
आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळल्यामुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीवर परिणाम होणार नाही, असे मत भारतीय कसोटी संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने पुजाराला संघात सामील केले. पुजारा २०१४ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये परतला आहे.