भारताने ऑस्ट्रेलियावर दबाव टाकला, लाबुशेनने दिली कबुली - मार्नस लाबुशेन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्विकारली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत आटपला. मार्नस लाबुशेनने सर्वाधिक ४८ धावा केल्या. डाव आटपल्यानंतर लाबुशेनने आपल्या खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली. "भारताने आमच्यावर दबाव टाकला" असे लाबुशेन प्रतिक्रियेत म्हणाला.