EXCLUSIVE : 'मी संपूर्ण तयारीनिशी ऑलिम्पिकला जाऊ इच्छिते', बॉक्सिंगपटू पूजा राणीशी खास बातचित - टोकियो ऑलिम्पिक २०२१ न्यूज
मुंबई - अशियाई चॅम्पियन आणि भारताची स्टार बॉक्सिंगपटू पूजा राणीने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. ती ७५ किलो वजनी गटातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. २३ जुलै २०२१ पासून जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी 'ईटीव्ही भारत'ने पूजा राणीशी बातचित केली. या बातचितमध्ये पूजा राणीने ऑलिम्पिकची तयारी, सहकारी खेळाडू यांच्याविषयी दिलखुलास उत्तरे दिली. पाहा काय म्हणाली पूजा राणी...