EXCLUSIVE: 'सिराजने भारतासाठी खेळत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले' - मोहम्मद सिराजचे कुटुंब न्यूज
हैदराबाद - भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा २-१ ने धुव्वा उडवत दैदिप्यमान यश मिळवले. भारताच्या या विजयात युवा गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाची भूमिका निभावली. त्याने भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या. महत्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर सिराजच्या वडिलांचे निधन झाले आणि तो अंत्यविधीसाठी जाऊही शकला नाही. दरम्यान, ब्रिस्बेन कसोटीसह मालिका जिंकल्यानंतर सिराजच्या हैदराबाद येथील घरात आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी 'ईटीव्ही भारत'ने सिराजच्या भावाशी बातचित केली. यात त्याच्या भावाने, आम्हाला सिराजवर गर्व असल्याचे सांगितले. पाहा संपूर्ण बातचित...