VIDEO : रवि दहियाचे प्रशिक्षक म्हणतात .. टोकियोमध्ये चांदी, पॅरिसमध्ये जिंकणार 'गोल्ड'
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू कवि दहियाने रौप्य जिंकल्याने देशात आनंदाचे वातावरण आहे. रवि लहानपणापासून जेथे कुस्तीचे डाव शिकत होता त्या छत्रसाल स्टेडियममध्ये त्याचे प्रशिक्षण व साथी डीजेवर डान्स करत आहेत. रविचे प्रशिक्षक ललित कुमार यांनी ईटीव्ही भारतशी एक्सक्लूसिव्ह बातचीत केली आहे. रविच्या प्रशिक्षकांनी सांगितले, की त्याला सुवर्ण पदक जिंकण्याच्या तयारीने स्पर्धेला पाठवले होते. मात्र काही उणिवांमुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरा कुस्तीपटू दीपक पुनियाच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त करत ललित कुमार म्हणाले की, पराभवामुळे निराश होऊन चालणार नाही. २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरीसाठी तयारीला लागावे. पॅरिसमध्ये भारतीय कुस्तीपटू सुवर्ण मिळवून देशाची मान उंचावतील. 2024 च्या ऑलम्पिकसाठी खूप कमी अवधी राहिला आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या सरावासाठी कोरोना परिस्थिती बाधा बनली आहे. मात्र पॅरिस ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेऊन मेहनत केली जाईल व केवळ गोल्ड मेडल जिंकण्याचे ध्येय असणार आहे. ललित कुमार यांनी सांगितले की दहियाने देशाचे नाव उज्जल केले आहे. भलेही त्याने रौप्य जिंकले असेल मात्र पुढच्या वेळा गोल्ड जिंकण्याची तयारी केली जाईल.
Last Updated : Aug 6, 2021, 6:17 AM IST