ऑस्ट्रेलिया ओपन : बार्टी, स्वितोलिना चौथ्या फेरीत, प्लिस्कोवा बाद - Alina Svitolina latest news
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली ऑस्ट्रेलियाची अॅश्वे बार्टी आणि युक्रेनची अलिना स्वितोलिनाने ऑस्ट्रेलिया ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर, चेक प्रजासत्ताकाची कॅरोलिना प्लिस्कोवा स्पर्धेतून बाद झाली. बार्टीने तिसऱ्या फेरीत एकातेरिना एलेक्जांड्रोवाला तर, स्वितोलिनाने यूलिया पुतिनसेवावर सरशी साधली.