EXCLUSIVE : जम्मू-काश्मीरचा रेसलर बादशाह खान डब्लूडब्लूई रिंगमध्ये उतरणार - jammu-kashmir wrestler badshah khan news
जम्मू-काश्मीर - द ग्रेट खलीनंतर भारताकडून आता डब्लूडब्लूईमध्ये जम्मू-काश्मीरचा 'बादशाह खान' सहभागी होणार आहे. बादशाह हा रामबन जिल्ह्यातील रहिवाशी असून त्याने डब्लूडब्लूईची प्रेरणा खलीकडून घेतली आहे. त्याच्या या निर्णयावर त्याच्या कुटुंबियांनी साथ दिली असून या स्पर्धेसाठी तो भरपूर मेहनत घेत आहे. बादशाहने डब्लूडब्लूईसाठीची नोंदणी केली आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारा जम्मू आणि काश्मीरचा पहिला रेसलर आहे. बादशाहने 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित केली. यात त्याने ट्रेनिंग, कुटूंब याबद्दल सांगितलं, पाहा काय म्हणाला बादशाह...