आजपासून रंगणार वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा थरार! - nadal in Australian open 2021
टेनिसविश्वातील महत्त्वाची आणि वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनला आजपासून प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या प्रकरणांमुळे ही स्पर्धा उशिरा सुरू होत आहे. पुरुषांमध्ये नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल आणि डॉमिनिक थीम तर, महिलांमध्ये सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका हे खेळाडू स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. २१ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा टेनिसचाहत्यांचे मनोरंजन करेल.