बटलर म्हणतो, ''आर्चर आणि स्टोक्स आमचे प्रमुख खेळाडू'' - जोस बटलर लेटेस्ट न्यूज
जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स हे आमच्या संघाचे प्रमुख खेळाडू असल्याचे मत इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने दिले आहे. ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर बटलर बोलत होता. श्रीलंकेतील मालिकेत आर्चर, स्टोक्स आणि सलामीवीर रोरी बर्न्सला विश्रांती देण्यात आली होती. ते संघापूर्वीच भारतात पोहोचले होते. उर्वरित संघ क्वारंटाइनमध्ये असल्याने त्यांनी शनिवारी सराव सुरू केला आहे.