VIDEO : विठुरायाच्या माघ वारीसाठी पंढरपुरात लगबग - श्री विठ्ठल रुक्मिणी माघ एकादशी सोहळा
पंढरपूर - पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी माघ एकादशी सोहळा 12 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. विठूरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांनी पंढरपूर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच माघ यात्रा होणार आहे. त्यामुळे पंढरपुरात पालखी व दिंड्या दाखल होत आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून माघ यात्रेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून विठुरायाची माघ वारी यात्रा कोरोनामुळे होऊ शकली नाही. विठूरायाच्या भेटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील पालखी व दिंड्या घेऊन वारकरी मोठ्या भक्तिभावाने पंढरपुरात दाखल होत आहेत. ही यात्रा आठ फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. यामध्ये भाविकांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही मंदिर समितीकडून देण्यात आले. तरी भाविकांनी पूर्व नियमाचे पालन करण्याचे आवाहनही विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST