अभिनेता राहुल व्होरा मृत्यू : वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणाचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल - medical negligence in Rahul Vohra treatment
नवी दिल्ली - अभिनेता आणि युट्यूबर राहुल व्होराचा कोरोना महामारीमुळे रविवारी मृत्यू झाला. त्याला दिल्लीमधील राजीव गांधी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या मृत्यूनंतर पत्नी ज्योती तिवारीने ह्रदयविदीर्ण करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ३५ वर्षीय अभिनेता राहुल हा रुग्णालयातील वैद्यकीय उपचारामध्ये निष्काळजीपणा होत असल्याचा दावा करत आहे. अभिनेता राहुलची पत्नी ज्योतीने न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. तरुण अभिनेत्याचे अकाली निधन झाल्याने चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.