ट्विंकल खन्नाची मुलगी निताराने केला अफलातून मेकओव्हर
पूर्वाश्रमीची अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. बऱ्यांचदा ती तिच्या मुलांबरोबर तिच्या रोमांचक आयुष्याबद्दल पोस्ट करीत असते. ट्विंकलने तिच्या इंस्टाग्रामवर मुलगी निताराने केलेल्या आनंददायक मेकओव्हरचा सेल्फी शेअर करुन तिच्या छोट्या मुलाचे मेकअप आर्टिस्ट म्हणून भविष्य नसल्याचा खुलासा केला.