घराबाहेर जमलेल्या गरजूंची विचारपूस करुन त्यांची अश्रू पुसणारा सोनू सूद - सोनू सूदची मदतीची ग्वाही
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या सुरू असलेल्या कोविड १९ (COVID -19) साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक गरजू लोकांसाठी ‘तारणहार’ बनला आहे. मागील वर्षापासून, त्याने लोकांना शक्य तेवढी मदत करणे चालूच ठेवले आहे. मुंबईतील आपल्या आपल्या घराबाहेर आलेल्या गरजूंची विचारपूस करण्यासाठी तो बाहेर आला. त्यांची तक्रारऐकून तातडीने त्यांना मदतीची ग्वाही त्याने दिली. स्थलांतरितांसाठी प्रवासाची सुविधा, गरजूंना अन्न आणि औषधांचा पुरवठा, रुग्णांना बेड उपलब्ध करुन देणे अशी असंख्य परोपकारी कामे तो देशभर करीत आहे.