शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसाचे मीडियासोबत सेलेब्रिशन - शिल्पा शेट्टी वाढदिवस
बॉलिवूडमधील फिट कलाकारांपैकी एक शिल्पा शेट्टी ८ जून रोजी ४६ वर्षांची झाली. यानिमित्ताने तिने आपला वाढदिवस हौशी फोटोग्राफर्ससोबत साजरा केला. यावेळी तिने केकही कापला. दोन मुलांची आई असलेली शिल्पा पांढर्या ब्लेझरमध्ये सुंदर दिसत होती. शिल्पासोबत तिची बहीण शमिता, पती राज कुंद्रा आणि मुलगा वियान होते. या सर्वांनी हसत कॅमेऱ्याला पोज दिली.