समुद्राच्या तळाशी 'मत्सकन्ये'च्या अवतारात दिसली कियारा अडवानी - कियारा अडवानीचा मत्सकन्या अवतार
अभिनेत्री कियारा अडवाणीने रविवारी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये समुद्राच्या तळाशी रंगबिंरगी मास्यांसह प्रवाळांचे सुंदर दर्शन तिने चाहत्यांना घडवले आहे. समुद्राच्या तळाशी ती निऑन ग्रीन बिकिनी परिधान करुन तरंगताना दिसत आहे. मत्सकन्या बनलेल्या कियाराचा हा सुंदर व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.