विरुष्काने यूएईमध्ये घेतला जादुई सूर्यास्तातील समुद्रस्नानाचा आनंद - Royal Challengers Bangalore Latest News
दुबई - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या दिवसांत बर्यापैकी आनंदात आहे. पहिली गोष्ट म्हणजे, त्याचा आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्याच्या हंगामात चांगली कामगिरी करत आहे आणि दुसरे म्हणजे तो बाप बनणार आहे. सध्या त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याच्याबरोबर आहे. रविवारी इंस्टाग्रामवर विराटने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो आरसीबीचा सहकारी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने काढला आहे. फोटोत स्टार जोडपे समुद्रात मावळत्या सूर्याच्या सुंदर पार्श्वभूमीवर एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दिसत आहे.