भूताची भीती टाळण्यासाठी विकी कौशल करतो 'हा' उपाय, 'भूत' चित्रपटाचा उलगडला प्रवास - Bhoot film Promotion
मुंबई - बॉलिवूडमध्ये अल्पावधितच लोकप्रिय झालेला विकी कौशल लवकरच 'भूत' या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या विकी कौशल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान त्याने या चित्रपटात भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता, हे सांगितले आहे. तसेच, खऱ्या आयुष्यात भूताची भीती वाटल्यास तो हनुमान चालिसा वाचत असल्याचंही त्याने सांगितलं आहे. भानु प्रताप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.