रिल आणि रिअल लाईफमध्ये विकी कौशल सिंगलच, हॅप्पी एन्डिंग लव्ह स्टोरीची पाहतोय वाट... - पछताओगे
मुंबई - अभिनेता विकी कौशल बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेता बनला आहे. त्याच अभिनय आणि त्याचं व्यक्तिमत्व चाहत्यांवर नेहमीच भूरळ पाडतं. सध्या तो त्याच्या 'पछताओगे' या म्युझिक अल्बममुळे चर्चेत आलाय. या गाण्यात त्याला त्याच्या प्रेमाकडून दगा मिळाल्यानंतर तो स्वत:चे आयुष्य संपवून घेतो, असं दाखविण्यात आलं आहे. तसं पाहिलं तर, विकीच्या रिल लाईफ चित्रपटांमध्येही त्याला शेवटपर्यंत त्याचे प्रेम मिळत नाही. 'पछताओगे' गाण्याच्या सक्सेस पार्टीमध्ये विकीने त्याच्या रिल आणि रिअल लाईफचे काही धमाल किस्से सांगितले आहेत.