जखमी टायगर श्रॉफच्या मदतीला धावली दिशा पाटणी - टायगर श्रॉफ फुटबॉल खेळताना जखमी
टायगर श्रॉफला चॅरिटीसाठी फिल्म इंडस्ट्रीच्या सहकाऱ्यांसोबत फुटबॉल खेळत असताना दुखापत झाली. टायगरला दुखापत झाल्याचे समजताच त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पाटणी तात्काळ त्याची काळजी घेण्यासाठी पोहोचली. यावेळी मैदानात अर्जुन कपूर, अपशक्ती खुराना, मीझान, अहान शेट्टी हेदेखील खेळत होते. टायगरला झालेली दुखापत किरकोळ होती. काही वेळानंतर तो मैदानाच्या बाहेर दिशासोबत चालत निघून गेला.