उत्तराखंड मुख्यमंत्र्याची मानसिकता महिलांवरील गुन्ह्यांना प्रोत्साहित करते - जया बच्चन - जया बच्चन यांचे रिप्ड जीन्सबद्दलचे विधान
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थ सिंग रावत यांनी महिलांनी जीन्स घालण्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, असे विधान त्यांनी केले होते. या विधानाला अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तीर्थ सिंग यांचे विधानावर निराशा झालेल्या बच्चन यांनी म्हटलंय की, “महिलांवरील गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारी ही मानसिकता आहे.”