थलायवी ट्रेलर लॉन्च :कंगना झाली भावूक, विजय आणि अरविंद स्वामींचे मानले आभार - जयललीता बायोपिक
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललीता यांच्या जीवनावर आधारित थलायवी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी अभिनेता अरविंद, कंगना रणौत आणि दिग्दर्शक ए. एल. विजयसह अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी आपल्या सहकालाकारांबद्दल बोलताना कंगना भावूक झाली होती. कंगनाने अरविंद यांचे आभार मानले. ती म्हणाली की, महिला केंद्रीत चित्रपटात काम करण्यासाठी मोठे नायक तयार नसतात. अरविंद यांनी या चित्रपटात एमजीआर यांची भूमिका साकारली आहे.