हृतिकची पूर्वीची पत्नी सुझान खानने दिली वांद्रे पोलीस स्टेशनला भेट, जाणून घ्या का? - इंटिरियर डिझायनर सुझान खान
हृतिक रोशनची पूर्वीची पत्नी सुझान खान वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आल्यामुळे बॉलिवूडच्या नजरा रोखल्या होत्या. सध्या ती कोणती तक्रार दाखल करीत आहे का अशा शंकाही काहींना आल्या. पण ती कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी आली नव्हती तर पोलीस स्टेशनच्या नुतणीकरणासंबंधी ती आली होती. आपल्याला माहिती असेल की सुझान खान ही नामवंत इंटिरियर डिझायनर आहे. ती पोलीस स्टेशनची नव्याने रचना करणार आहे आणि तिची भेटही त्याच संदर्भात होती.