शाहरुखची को-स्टार शिखाने कोविडमध्ये नर्सिंग केल्यानंतर अर्धांगवायूच्या झटक्याशीही केला सामना - शिखा मल्होत्राला अटॅक
शिखा मल्होत्रा बॉलिवूड अभिनेत्रीचे ग्लॅमरस आयुष्य जगत होती. २०१६ मध्ये इंडस्ट्री सुपरस्टार शाहरुख खानसोबत काम करण्यापासून ते २०२० च्या रिलीज झालेल्या 'कांचली: लाइफ इन अ स्लो'मध्ये मुख्य भूमिका साकारण्यापर्यंत, शिखा मल्होत्रा बॉलिवूडच्या विश्वात रमली होती. पण जेव्हा देशात कोरोनाची साथ आली तेव्हा शिखाने मुंबईतील सरकारी रुग्णालयात नर्सिंग ऑफिसर म्हणून रुग्णांची सेवा सुरु केली. मात्र सात महिन्यानंतर तिला कोरोनाने गाठले. तिची चाचणी पॉझिटीव्ह आली. एक महिन्याच्या उपचारानंतर ती बरी झाली. मात्र तिला अर्धांगवायूचा झटका आला आणि तिचे उजवे शरीर लुळे बनले. या आजाराशीही तिने दोन हात केले आणि ती आता पुन्हा बरी होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली आहे.