सोनू सूदने पुन्हा मने जिंकली, होमटाऊन मोगामध्ये वाटल्या ई-रिक्शा - सोनू सूद
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा कोविड -१९ च्या साथीच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. गरिबांना ई-रिक्षा वाटप करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. यावेळी त्यांनी पंजाबच्या मोगामधील गरजू लोकांना ई-रिक्षा दिल्या आहेत. याबाबत तो म्हणाला, “गरजू लोकांना मदत करण्यासाठी माझे हे लहानसे योगदान आहे. आम्ही हे काम संपूर्ण देशात करत आहोत. मी मोगापासून सुरुवात केली आहे कारण हे माझे शहर आहे आणि लोकांचे आनंदी चेहरे पाहून मला आनंद झालाय. ” सोनू सूदनेही शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. तो म्हणाला, “यावर तोडगा काढायला हवा. शेतकरी आणि सरकारने दोघांनीही एकमेकांचे म्हणणे ऐकले पाहिजे आणि एक निष्कर्ष काढला पाहिजे. "