सुवर्णमंदिराला भेट देऊन सोनालीने केली नव्या वर्षाची सुरुवात - Sonali Bendre visits Golden Temple
अभिनेता सोनाली बेंद्रे हिने नव्या वर्षाची सुरुवात बुधवारी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट देऊन केली. पती गोल्डी बेहल आणि कुटुंबीयांसोबत तिने अमृतसरला हजेरी लावली होती. मागच्या वर्षात तिच्या आयुष्यात बऱ्यात घडामोडी घडल्या. कॅन्सरवर यशस्वी मात करून ती मायदेशी परतली. सोनालीने आपल्या चाहत्यांनाही नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.