'सिदनाझ' चाहत्यांच्या मागणीवरुन म्यूझिक व्हिडिओचे शीर्षक बदलले - सिदनाझचा अप्रकाशित संगीत व्हिडिओ
दिवंगत टेलिव्हिजन स्टार सिद्धार्थ शुक्ला आणि त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाज गिल यांचा अपूर्ण राहिलेल्या म्यूझिक व्हिडिओचे शीर्षक चाहत्यांच्या इच्छेनुसार बदलण्यात आले आहे. अलिकडे जेव्हा अधुरा या गाण्याचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले तेव्हा दिवंगत सिध्दार्थच्या चाहत्यांनी गाण्याचे शीर्षक बदलून हॅबीट करण्याची मागणी केली. हेच शीर्षक अगोदर ठरले होते. सिदनाझच्या चाहत्यांचा आदर ठेवून म्युझिक लेबल सारेगामाने बदललेल्या शीर्षकासह गाण्याचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे.